वेळापूर – महावितरणाच्या कथित सुलतानी कारभाराविरोधात तसेच शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विविध वीज समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार उत्तमराव शिवदास जानकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या पदयात्रेत हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असून, जनतेला २४ तास सिंगल फेज वीज, शेतकऱ्यांना ८ तास अखंड वीज पुरवठा, वारंवार होणारे लोडशेडिंग बंद करणे तसेच महावितरणाचा अन्यायकारक कारभार थांबविण्याची मागणी करण्यात येणार आहे.
ही पदयात्रा गुरुवार दिनांक २१ मे रोजी सकाळी ९ वाजता वेळापूर येथील गरुड बंगला येथून सुरू होणार असून माळशिरस तहसील कार्यालयापर्यंत सुमारे १८ किलोमीटर अंतराची पदयात्रा काढण्यात येणार आहे. समारोप माळशिरस तहसील कार्यालय परिसरातील सर्टिफाय हायस्कूल ग्राउंड येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
शेतकरी, युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या निर्णायक लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 5