सोलापूर : औषधांचा विवेकी वापर, सुरक्षित आरोग्यसेवा आणि अँटिबायोटिक रेझिस्टन्सच्या वाढत्या धोक्याबाबत जनजागृती करण्यासाठी डी. एस. टी. एस. मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय फार्मसी सप्ताह २०२६ उत्साहात साजरा करण्यात आला. ‘स्वस्थ भारत : Combating Antimicrobial Resistance’ ही सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना होती.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन यांच्या सहकार्याने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये फार्मा रॅली, पथनाट्य, सायंटिफिक कार्टून, माहितीपत्रक निर्मिती, फार्मा प्रश्नमंजुषा, पोस्टर सादरीकरण आणि सोशल मीडिया रील स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत औषधांच्या योग्य वापराचा संदेश दिला.
या स्पर्धांमधील विजेत्यांची ४ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे.
या उपक्रमासाठी डॉ. गणेश गजेली, दीपक भोसले, डॉ. उत्कर्षा शिवशरण, डॉ. योगेश थोरात, मनोज मडकी, मंजूषा बंडी, प्रतीक डांगे, नीलांबरी खानापूरे, अनुप ढंगे, वैष्णवी गजुल आणि मीनल भांजे यांनी परिश्रम घेतले. सप्ताह समन्वयक म्हणून डॉ. वर्षा तेगेळी यांनी काम पाहिले. संस्थेचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे आणि प्राचार्य डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले.
‘आजचा विवेकी औषधवापर, उद्याचे सुरक्षित आरोग्य’ हा संदेश देत या उपक्रमातून जनजागृती करण्यात आली.
Post Views: 5