श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ संचलित बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल येथे “आंतरशालेय वकृत्व स्पर्धेचे
बक्षिस वितरण लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रदीप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी
मान्यवरांचे स्वागत सौ. स्वप्ना शिंदे यांनी केले.
याप्रसंगी संस्थेचे खजिनदार मा. श्री शंकर पाटील, विश्वस्त श्री एस. एस. मुनाळे तसेच प्रशालेच्या प्राथमिक
विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी पुर्वत, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.अपर्णा कदम उपस्थित होते.
आजच्या स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यानी महात्मा फुलेंच्या बुद्धीप्रामाण्यवादी तत्त्वानुसार स्वातंत्र्य,
समता, शिक्षण,कौशल्य या आधारे आपली प्रगती करावी.असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. प्रदीप जगताप यांनी
आपल्या भाषणात केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. बी. कावळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
पाहुण्यांचा परिचय सौ. रश्मी पुर्वत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन सौ. स्वप्ना शिंदे यांनी तर
आभार प्रदर्शन सौ. वृषाली गडहिरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.




















