बार्शी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या मराठी विषयाच्या बी.ए. तृतीय वर्षासाठी नवीन अभ्यासक्रम या वर्षी लागू होत आहे. बी.ए. तृतीय वर्ष सत्र सहावेमध्ये मराठी विज्ञान साहित्य या पेपरमध्ये डॉ. सुनील विभुते यांच्या मिरॅकल या विज्ञान कथासंग्रहातील ‘ कार्डिओ- ७७ ‘ या कथेचा समावेश करण्यात आला आहे.
प्रा.डाॅ. सुनील विभुते यांच्या यशाबद्दल राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, प्रसिध्द साहित्यिक डॉ.छाया पाटील. मेधा उज्जैनकर, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, रेडक्रॉस ब्लड बँकेचे प्रेसिडेंट डॉ विक्रम निमकर,मसाप बार्शी शाखेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्था यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.