सोलापूर – वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथे, राष्ट्रीय विद्यार्थीदिनानिमित्त, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी यांच्या “राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांची भूमिका”- या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना – रामप्रसाद बिस्मिल्ल यांच्या, ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है”- या पद्यपंक्तीचा संदर्भ देऊन, 1857 च्या क्रांती पासून ते देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांचा, सोलापूरच्या हुतात्म्यांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करून, त्या वेळच्या क्रांतिकारक युवकांनी जे ठरवले ते केले.

भारत हा युवकांचा/ तरुणांचा देश आहे.त्यामुळे, युवकांनी देशाच्या विकासात योगदान देणे महत्त्वाचे आहे. देशातील तरुण म्हणजे, ‘सॉफ्ट पावर’ आहे. आपला देश घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो. प्रत्येकाला एकच मत देण्याचा मतदानाचा अधिकार मिळाला आहे. देशातील विकासाच्या टप्प्यांचा उल्लेख करताना त्यांनी, कृषी क्षेत्रातील हरितक्रांती, श्वेतक्रांतीचा उल्लेख करून ,’ इस्रो’ मध्ये सॅटॅलाइट प्रक्षेपणासाठी लागणाऱ्या ‘क्रायोजेनिक ‘ इंजिन भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केले, विजय भटकर यांनी ‘ परम ‘सुपर कम्प्युटर तयार केल्याचे नमूद करून मंगळयान व चंद्रयानाची मोहीम यशस्वी केल्याबद्दल तरुण भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक करून, जगाकडे युवकांनी चिकित्सकपणे पाहणे गरजेचे असल्याचे सांगितले. “स्टुडंट्स पावर, नेशन्स पावर”- याचा उल्लेख करून, देशात सध्या चाललेल्या विविध आंदोलनांचा उल्लेख करून,विधायक आंदोलन विध्वंसक कृत्य न करता देखील करता येते. आजचा विद्यार्थी हा भविष्याचा नाही तर,आजचाच नागरिक आहे. जगात घडलेल्या विविध घटनांचे परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतात.त्यामुळे, कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये युवकांचे योगदान असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी “स्क्रीन टाईम” कमी करून, योग्य संस्कार करून घेऊन “करिअर फॉर द नेशन”-‘( देशासाठी माझी काय भूमिका’ असावी) याबद्दल विचार करून, समाज व देशाबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवावी. अध्यक्षीय मनोगतामध्ये
प्राचार्य डॉ. संतोष कोटी सर यांनी, गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करून, जैन आचार्य परमपूज्य 108 विद्यासागर महाराजांचा कार्याचा उल्लेख करून, स्वदेशी भाषांचा वापर, सुतकताई, ‘इंडिया नही, भारत बोलो’ – या विचारांचा मागोवा घेऊन, वर्तमान पिढीने देशाच्या विकासामध्ये आपले योगदान देणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन, सरस्वती, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाला. याप्रसंगी, नताशा कोतापल्ली यांनी आपले मनोगत व्यक्त केले.. याप्रसंगी, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.मनोहर जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ.जीवराज कस्तुरे, तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन तुपकर यांनी केले.
Post Views: 7