सोलापूर : जिल्हा सोलापूर कलाध्यापक संघाच्या वतीने आयोजित शहरस्तरीय रंगभरण स्पर्धेत एकूण 572 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत 12 विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सहस्रार्जुन शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
सहस्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी एकूण 6 बक्षिसे पटकावली. यात श्रवण सुनिल कुरुडे (मोठा गट – प्रथम), सिद्धार्थ कपिल सुरवसे (द्वितीय), विश्व रमेश दोमा (इयत्ता दुसरी – प्रथम), प्रणाली आमगोंडा वाघोली (इयत्ता दुसरी – द्वितीय), श्रेया भिकुसा कोल्हापुरे (इयत्ता चौथी – प्रथम) व निदा शब्बीर हणगी (इयत्ता तिसरी – द्वितीय) यांनी यश मिळविले.
सहस्रार्जुन इंग्लिश मिडियम स्कूलने 3 बक्षिसे मिळवली. यात गणेश रूद्रगौडा माळीपाटील (यूकेजी – तृतीय), अनन्या नागेश बोराटे (इयत्ता तिसरी – प्रथम) व संध्या श्रीधर काळे (तृतीय) यांचा समावेश आहे.
सहस्रार्जुन प्रशाला, सोलापूर येथील विद्यार्थ्यांनीही 3 बक्षिसे मिळवली. यात प्रगती प्रकाश लेंगरे (इयत्ता पाचवी – प्रथम), सौफिया कुमेल शेख (प्रथम) व गौरी अभिमान डोके (प्रथम) यांनी यश संपादन केले. प्रशालेच्या कला शिक्षिका संगिता मिलिंद पवार यांना “उपक्रमशील कलाध्यापक” पुरस्कार तर मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी बिराजदार यांना “उपक्रमशील मुख्याध्यापिका” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष संजीवसा महादेवसा बिद्री, सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजुसा बाबुरावसा भूमकर, ट्रस्टचे सचिव जयकुमारसा भागवतसा कोल्हापुरे, सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन कृष्णातसा गोयल, प्रशालेचे मुख्याध्यापक मोरेश्वर काटवे तसेच प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशिद यांनी केले.


















