सोलापूर : सार्वजनिक रस्ते, चौक, उद्याने व इतर सार्वजनिक ठिकाणांच्या नामकरणाबाबत सोलापूर महानगरपालिकेने स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील तीन सर्वसाधारण सभांमध्ये नामकरणाचे सुमारे ७० प्रस्ताव, तर सध्याच्या सभेसाठी ३० नवीन प्रस्ताव विचाराधीन आहेत. सार्वजनिक मालमत्तांना राष्ट्रपुरुष, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक, संत, महापुरुष तसेच देश-समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचीच नावे द्यावीत. वैयक्तिक व्यक्तींच्या नावांचे प्रस्ताव वारंवार येत असल्याने प्रशासनाचा वेळ, मनुष्यबळ व सार्वजनिक निधी खर्च होत असल्याने त्यावर मर्यादा आणाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी माजी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, इशरद नागोरे, जैनुद्दीन नदाफ, अरविंद शेळके, गजानन शिंदे, राहुल मेरू आदी उपस्थित होते.
Post Views: 11