बार्शी – अभ्यास, शिस्त आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून देत मोबाईल व सोशल मीडियाच्या आहारी न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा, शिक्षणाच्या बळावर पोलीस किंवा सैन्य दलात अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न बाळगा, असा प्रेरणादायी संदेश पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी विद्यार्थ्यांना दिला.
बार्शी येथील नवीन मराठी शाळेच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या सेमी इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्याला शैक्षणिक भेट दिली. यावेळी ते बोलत होते. पोलीस उपनिरीक्षक अभयकुमार माकणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.