सोलापूर – सुभाष उद्यान येथे झालेल्या १७ वर्षाखालील शालेय शहर शूटिंग बॉल स्पर्धेत सोशल उर्दू हायस्कूलने विजेतेपद पटकाविले.
अंतिम सामन्यात त्यांनी सोशल इंग्लिश मीडियम स्कूलचा पराभव केला. या कामगिरीवर संघाची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत उमरफारुख बद्दी, नोमान धोटेघर, अफवान पतलबाप, इस्माईल अत्तार खलील चौधरी, समी तांबोळी, फुरकान अत्तार यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. संघातील खेळाडूंना अ. रहिम शेख, अलिम शेख, अवेज मर्चंट आणि कामरान दलाल यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाला व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. अखलाक वडवान, सहसचिव इम्तियाज शेख, मुख्याध्यापक रसूल चौधरी, उपमुख्याध्यापक इम्तियाज शाब्दी, पर्यवेक्षिका यास्मिन शेख, पर्यवेक्षक अल्ताफ कुमठे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.





















