
सांगोला – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील सोमनाथ ढेरे याची उद्योग, बँकिंग, विमा, आरोग्य, उत्पादन आणि सेवा क्षेत्रांसाठी आधुनिक स्वयंचलित तंत्रज्ञान विकसित करणारी अग्रगण्य असलेली ऑटोमेशन एज टेक्नॉलॉजी प्रा.लि या कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्या डाॅ.विद्याराणी क्षीरसागर यांनी दिली. सदर निवड झाल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा नीलवर्णा रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ.अमित रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, प्राचार्य डाॅ.रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ.विद्याराणी क्षीरसागर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.धनंजय शिवपुजे, संगणक विभागप्रमुख प्रा.तानाजी धायगुडे यांनी सोमनाथ ढेरे याचे अभिनंदन केले.
Post Views: 7