पंढरपूर – येथील विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग पुणे येथील संचालक महेश पालकर व सोलापूर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सदिच्छा भेट दिली.
या सर्व मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य डॉ.यू. आर. मुंढे यांनी केले व प्रशालेतील विविध शैक्षणिक सुविधांची माहिती दिली.यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम व सुरक्षिततेसाठी घेतले जाणारे केले जाणारे उपाय याविषयी त्यांनी माहिती दिली.
यावेळी शिक्षण संचालक पालकर यांनी विवेक वर्धिनी मध्ये केलेल्या विविध शैक्षणिक सुविधा व विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून अशा प्रकारचे सुविधा असणारी ही एकमेव प्रशाला असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी विवेक वर्धिनी ही जिल्ह्यातील एक नामांकित प्रशाला असून येथे नेहमी गुणवत्त्वावाढीसाठी प्रयत्न केले जातात असे प्रतिपादन केले.
यावेळी उपप्राचार्य ई.जी. शिंदे, विभाग प्रमुख व्हि.डी.चौगुले, प्रशालेतील शिक्षक बाळासाहेब शिंगाडे, डी.एच. करचे, पी.ए, व्यास, अमोल हुंगे तसेच इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 10