
सांगोला – केवळ आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आ.सुभाषबापू देशमुख यांच्या कल्पनेतून शैक्षणिक कर्ज योजना सुरू केलेली आहे. लोकमंगल बँकेच्या या योजनेतून समाजातील गरजू विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन बँकेचे संचालक विजय कुलकर्णी यांनी केले. ते लोकमंगल बँकेच्या सांगोला शाखेच्या वतीने इ.१० व १२ वी परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक रामहरी लेंडवे, शाखा सल्लागार ऍड.गजानन भाकरे, यतिराज सुरवसे उपस्थित होते. याप्रसंगी श्रीयस ठोंबरे, भाग्यश्री इंगवले, तन्वी घोरपडे, स्वराज्य जांगळे, श्रेयस सुरवसे, संचिता देशमुख, सोहम माळी, समृद्धी माळी, गणेश आदलिंगे, सिद्धी उकळे, अर्जुन सावंत, जिद्यासा घोंगडे, वैदेही देशपांडे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ऍड.गजानन भाकरे यांनी मार्गदर्शन तर पालक विष्णू माळी व मनोज जांगळे, वैदेही देशपांडे, सोहम माळी यांनी मनोगत व्यक्त केले. बँकेचे शाखा व्यवस्थापक शिवाजी दरेकर यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर करून विविध कर्ज योजना याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती गुळमिरे यांनी केले. आभार सुहास वालीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय महामुनी, विजय स्वामी यांनी परिश्रम घेतले.