सोलापूर – अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ या वर्षांत गुजरात येथे झालेल्या लॉन टेनिस या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्यास पहिल्यांदाच एकेरी व दुहेरीत २ सुवर्ण पदके मिळवून देऊन राज्याचा नावलौकीक केलेल्या आंतरराष्ट्रीय टेनिसपटू संध्याराणी बंडगर, मुख्यलेखापाल, सामाजिक वनीकरण, सोलापूर यांचा सचिवालय जिमखाना, मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हा गौरव माझे प्रशिक्षक तसेच मार्गदर्शक राजीव देसाई यांचा देखील असल्याच्या भावना संध्याराणी बंडगर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. त्याच प्रमाणे माझ्या या यशात माझ्या कुटुंबियांचे देखील मोठे योगदान असल्याचे संध्याराणी यांनी नमूद केले.
संध्याराणी हिच्या या यशाबद्दल राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सुतार , सचिव सुंदर अय्यर , जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post Views: 159