बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वखारिया विद्यालय, उपळे दुमाला या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्यानिमित्ताने देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना राख्या पाठविल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि सैनिकांप्रती बंधूभावाची भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली. हा उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. उपक्रम प्रमुख रुकसार बागवान यांनी मुलींकडून राख्या बनवून घेतल्या. तसेच सैनिकांना राख्यांसोबत शुभेच्छा संदेश पाठवला. विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विकास बुरगुटे यांनी परिश्रम घेतले. सैनिकांना राख्या पाठविताना बार्शी मुख्य पोस्टाचे जनसंपर्क अधिकारी राहुल जाधव, टपाल तिकीट संग्राहक उदयकुमार पोतदार, वृक्षमित्र सुनिल फल्ले, मुख्य पोस्टातील स्टाफ हजर होता.