सोलापूर : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रखरखत्या उन्हात वीरशैव व्हिजनने पाणी बाटली वाटप करून त्यांना एक प्रकारे जलाश्रयच दिला आहे असे प्रतिपादन उद्योजक मल्लिकार्जुन खेड यांनी केले. तुळजापूरला पायी जाणाऱ्या श्री तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी तळे हिप्परगा येथे पाणी बाटली वाटप शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या सेवेचा शुभारंभ उद्योजक मल्लिकार्जुन खेड व पोलीस उपनिरीक्षक नागेश इंगळे, उद्योजक मनोज सावळगी, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी सलग दहाव्या वर्षी 10 हजार देवीभक्तांना उन्हाच्या उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी पाणी बाटली थंड करून वितरित करण्यात आले. याप्रसंगी सचिव नागेश बडदाळ, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, युवक आघाडी सचिव राहुल बिराजदार, श्रीकांत लोणी, अनंतकुमार डोंबाळे, मन्मथ कपाळे, योगेश कापसे, गंगाधर झुरळे, शांतवीर बसवंती, वीरभद्र सुतार, लायप्पा बिडवे यांनी सहकार्य केले.



















