मैंदर्गी : येथील ग्रामदैवत श्री विरभद्रेश्वर मंदिरात 7 सप्टेंबर, सोमवार रोजी अग्नीसोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्रावण मासानिमित्त मंदिरात रोज विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. श्रावणातील प्रत्येक सोमवारी पालखी मिरवणूक काढण्यात येते. रोज पहाटे 4 वाजता श्रीस रुद्राभिषेक व बिल्वार्चन अर्पण केले जात असुन शेवटचा श्रावण सोमवारी रोजी पहाटे 2 वाजता अग्नी प्रज्वलन व पहाटे 4 वाजता महारुद्राभिषेक आणि सकाळी 8 वाजता पुरवंत सेवा होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता गावातील प्रमुख मार्गाने पालखी दुपारी मिरवणूक आणि सकाळी 1 वाजता अग्नीसोहळा पार पाडणार आहे.
पुरवंत सेवा बजावण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील असंख्य भाविक येत असतात नंतर गौरीकट्टा येथे पुरवंत सेवा होईल. सकाळी 10 वाजल्यापासून भाविकासाठी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. तरी या कार्यक्रमाचा परिसरातील भाविक भक्तानी याचा लाभ घ्यावा असे अवाहन वीरभद्रेश्वर पंचकमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 7