बार्शी – यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोजर इंग्लिश स्कूल माध्यमिक विभागाच्यावतीने ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ वस्तू बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग नोंदवला. इयत्ता ५ ते ७ व इयत्ता ८ ते १० या दोन गटात ही स्पर्धा संपन्न झाली.
विविध स्पर्धांच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना विकास व्हावा, तसेच मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बॉटल्स, बांबू, कार्डबोर्ड, लाकूड, वृत्तपत्रे, कपडे, टायर यासारख्या अनेक टाकाऊ गोष्टींपासून आकर्षक व सुंदर वस्तू तयार केल्या.
या स्पर्धेचे परिक्षण मुख्याध्यापक संदीप पोळ लिपीक भगवंत बडवे यांनी केले. यामध्ये इयत्ता ५ ते ७ या गटातून अनुक्रमे सर्वज्ञ शिंदे प्रथम, अलिझा आत्तार द्वितीय व आर्यन बारंगुळे तृतीय तर इयत्ता ८ ते १० या गटातून अनुक्रमे कृष्णा इंगळे, प्रांजल वाघमारे आणि साद शेख यांनी क्रमांक मिळवले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे मुलांनी या स्पर्धेचा आनंद घेतला.
सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे व्यवस्थापन शिक्षक सचिन शिंदे आणि शिक्षिका प्रमोदिनी गायकवाड यांनी केले. तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली.
Post Views: 15