मोडनिंब – भाजपा महिला आघाडी माढा तालुका पूर्व मंडलच्या वतीने मोडनिंब (ता.माढा) येथे महिला सहकारी संस्था मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात उपस्थित महिलांना कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.मेळाव्यास प्रदेश प्रतिनिधी व सोलापूर जिल्हा प्रदेश प्रभारी रुपाली नयन लठ्ठे, टेंभुर्णीच्या सरपंच व सोलापूर पश्चिम महिला जिल्हाध्यक्षा सुरजा योगेश बोबडे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या वंदना कांबळे, पंचायत समिती सदस्या सोनाली माळी, सरपंच लक्ष्मी पाटील, अंजनगाव सरपंच अरुणा चौगुले, तालुका महिला अध्यक्षा अर्चना सावंत, तालुका महिला उपाध्यक्षा रोहिणी मोहिते, मोडनिंब शहराध्यक्षा मनीषा गिड्डे आदी उपस्थित होत्या.यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला आघाडी माढा पूर्व मंडलच्या वतीने करण्यात आले.




















