कुर्डुवाडी – माझ्याकडे का बघतो म्हणत पूर्वीचा राग मनात धरून इतरांना फोन करुन बोलावून घेत चौघाजणांनी तलवार व कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना बार्शीनाक्याजवळ भोसरे कुर्डुवाडी येथील बायपास रस्त्याजवळ दि.२४ रोजी रा.११.३० वा घडली. याबाबत जखमी सुहास उर्फ हरी सुरेश बागल रा.बागलवस्ती भोसरे ता.माढा यांनी कुर्डुवाडी पोलिसांत चौघाजणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी हे बार्शीनाका येथील हाॅटेल सारथी जवळील सार्वजनिक रोड भोसरे (कुर्डुवाडी) येथून घरी जात असताना त्यांचा गहाळ झालेला मोबाइल शोधत होते.दरम्यान अनिकेत माने रा.वाघ वस्ती कुर्डुवाडी हा तेथून फिर्यादीकडे रागाने बघत गेला व परत येऊन माझ्याकडे का बघतो असे म्हणून शिवीगाळ केली. पूर्वीचा राग मनात धरून हरी बागल सापडला आहे असे म्हणून फोन करुन सुमित करकंबकर,लक्ष्मण ढवळे व इतर यांना बोलावून घेतले. सुमित करकंबकर याने कोयता व लक्ष्मण ढवळे याने तलवार दाखवल्यानंतर फिर्यादीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.तेवढ्यात अनिकेत माने ने पाठीमागून लाथ घातली आणि फिर्यादी खाली पडला. त्यावेळी अनिकेत व अनोळखी इसमाने लाथाबुक्क्याने मारहाण केली.दरम्यान सुमित करकंबकर व लक्ष्मण ढवळे याने त्यांच्याकडील कोयता व तलवारीने फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अंगावर ठिकठिकाणी वार करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी फिर्यादीला वाचविण्यासाठी दीपक साळवे हा आला असता सुमित करकंबकर याने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले.त्यावेळी जमलेल्या लोकांना वरील सुमित, लक्ष्मण,अनिकेत यांनी कोयता व तलवार दाखवून शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. याबाबत फिर्यादी सुहास उर्फ हरी सुरेश बागल रा.बागलवस्ती भोसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील चौघांविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत बी एन एस कलम १०९,११८(१),११५(२),३५२, ३५१(२), ३(५),आर्म ॲक्ट कलम ४,२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकास बालसुधारगृहात दाखल करण्यात आले असून दोघांना पाच दिवसाची पोलिस कोठडी मीळाली आहे.पुढील तपास पो.नि.अतुल मोहिते हे करत आहेत.
Post Views: 11