
वैराग (प्रतिनिधी ): बार्शी तालुक्यातील सासुरे येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. गावातील एका ४० वर्षीय तरुणाने राहत्या घराजवळील चिंचेच्या झाडाला अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे सासुरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अविनाश श्रीधर बनसोडे (वय ४०, रा. सासुरे, ता. बार्शी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अविनाश बनसोडे यांनी शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोणत्यातरी अज्ञात कारणावरून टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी राहत्या घराच्या पाठीमागील शेतात असलेल्या चिंचेच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. हा प्रकार काही वेळानंतर आजूबाजूच्या लोकांच्या व कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. अविनाश यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
वैराग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
या घटनेबाबत गणेश हणुमंत बनसोडे यांनी तातडीने वैराग पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली. त्यांच्या खबरीवरून वैराग पोलिसांनी याप्रकरणी ‘आकस्मिक मृत्यू’ (मयत) म्हणून नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस करत असून, आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Post Views: 22