Saturday, September 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी

तरुण भारतbyतरुण भारत
June 13, 2026
in solapur
0
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दिनांक 12 (जिमाका) :- सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या जागेच्या संपादनाची प्रक्रिया सर्व संबंधित विभागाने तातडीने करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित उड्डाणपूल भूसंपादन प्रक्रिया आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन बोलत होते. यावेळी सोलापूर मनपा आयुक्त सचिन ओंबासे, शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उप आयुक्त वृष्टी जैन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, भूसंपादन अधिकारी प्रदीप बास्तेवाड, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता स्वप्नील पवार, महेश येमूल, सिटी सर्व्हे अधिकारी गजानन पोळ यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. कार्तिकेयन म्हणाले की, सर्व शासकीय व खाजगी जागांच्या मिळकतीचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावेत. केंद्र शासनाच्या पोस्ट मध्य रेल्वे, बी एस एन एल व ग्राउंड जागेसाठी सोलापूर महापालिका रेडीरेकनर दराप्रमाणे शुल्क देणार आहे. तसेच या जागेतून दुसऱ्या जागा साहित्य इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी येणारा खर्चही महापालिका देईल. त्यामुळे संबंधित विभागाने त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जागा हस्तांतरित करण्याबाबतचे मान्यता घेऊन त्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावेत असे त्यांनी सांगितले.

यावेळी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनीही मार्गदर्शन केले.

            सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत दोन महत्त्वाचे उड्डाणपुल प्रस्तावित आहेत. यात सेक्शन 1 जुना पुना नाका ते पत्रकार चौक (5.45 कि.मी.) व सेक्शन 2 जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला (5.00 कि.मी.) या मार्गांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने नगरोत्थान योजनेतून रु.299 कोटींची मंजुरी दिली असून शासन हिस्सा 70% व महापालिका हिस्सा 30% असा वित्तीय आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या सुधारीत आराखड्यानुसार भूसंपादनाचा खर्च रु.145.11 कोटी इतका आहे.

            शासनाकडून आतापर्यंत रु.84.438 कोटी प्राप्त झाले असून रु.17.139 कोटी उर्वरित आहेत, तर महापालिकेच्या हिस्स्यातील रु.25.55 कोटी जमा झाले आहेत.या प्रकल्पासाठी एकूण 10.55 हे.आर. क्षेत्राचे संपादन होणार असून त्यात खाजगी व शासकीय मिळकतींचा समावेश आहे. सेक्शन 1 मध्ये 137 मिळकतींपैकी 100 खाजगी व 37 शासकीय तर सेक्शन 2 मध्ये 100 मिळकतींपैकी 87 खाजगी व 13 शासकीय मिळकती आहेत. आतापर्यंत सेक्शन 1 मधील 61 खाजगी मिळकतींचा ताबा घेण्यात आला असून सेक्शन 2 मधील ताबा प्रक्रिया सुरू आहे.

            महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्य रेल्वे, बी.एस.एन.एल., तसेच पोलिस विभाग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा बाधित झाल्या आहेत.

Post Views: 80
Previous Post

४० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; वैराग पोलिसांत नोंद

Next Post

बोगस डॉक्टरच्या उपचारानंतर शेतकऱ्याचा मृत्यू? बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बोगस डॉक्टरच्या उपचारानंतर शेतकऱ्याचा मृत्यू? बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल 

ताज्या बातम्या

सोलापुरात महिलांसाठी वस्त्रोद्योगात रोजगाराची संधी #solapurnews #viral #news #latestnews#maazsolapur

September 12, 2026

बापरे दुचाकीच्या साध्या पिशवीत मिळाला चक्क दोन लाखांचा गांजा #viral #solapurnews #news #latestnews

September 12, 2026

३९ वर्षीय डॉक्टरचा सोलापूरच्या घरात आढळला मृतदेह

September 12, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #marathinews #news

September 12, 2026

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला रोखणार कसे मुंबई उच्च न्यायालय #viral #news

September 12, 2026

अखेर आयटी पार्कच्या जागेचा प्रस्ताव आला जिल्हाधिकार्याकडे #viral #solapurnews

September 12, 2026

पूजेला का बसला म्हणत दगडाने केली मारहाण #viral #marathinews #news

September 12, 2026

विशेष सरकारी वकील संतोष न्हावकर वैभव वाघे प्रकरणात काय म्हणाले पहा #viral #marathinews #news

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1195780

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!