अकलूज – रब्बी ज्वारी बियाण्याला ५० टक्के अनुदान; महाडीबीटीवर अर्ज सुरू*
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उप अभियान – पौष्टिक तृणधान्य (NFSNM-NC) अंतर्गत सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामासाठी प्रमाणित रब्बी ज्वारी बियाण्याचे ५० टक्के अनुदानावर वितरण करण्यात येणार आहे.
या योजनेत १० वर्षांतील नवीन वाणांसाठी ३० रु. प्रति किलो तर १० वर्षांवरील जुन्या वाणांसाठी १५ रु. प्रति किलो अनुदान देय आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांना बियाणे वितरण तर शेतकरी गटांना १०० टक्के अनुदानावर पीक प्रात्यक्षिकाचा लाभ मिळणार आहे.
इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी *
mahadbt.maharashtra.gov.in* या पोर्टलवर farmer login करून ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी अकलूज तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
Post Views: 14