सोलापूर – इंदापूर येथील भीमा नदीच्या पुलावर रस्ते अपघातात जखमी झालेल्या सांगोल्याच्या एका 68 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता मृत्यू झाला.
शोभा अशोक साळुंखे (वय 68 वर्षे ,रा. सांगोला) असे त्या मयत महिलेचे नाव आहे. त्या 17 जून 2026 रोजी सकाळी अकरा वाजता पुणे सोलापूर महामार्गावरील हिंगणगाव येथील भीमा नदी पुलावर (इंदापूर) रस्त्या अपघातात त्या जखमी अवस्थेत मिळून आल्या होत्या. त्यांना इंदापूर येथील आरोग्य केंद्रात उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात दुसऱ्या दिवशी इंदापूरच्या महिला पोलीस शिपाई निमगिरे यांनी दाखल केले असता सदर महिलेचा उपचारादरम्यान आज शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.
Post Views: 42