Sunday, July 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजपमध्ये एकदा ठरलं की मुंगीलाही कळत नाही-चंद्रकांत पाटील….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 11, 2024
in maharashtra
0
भाजपमध्ये एकदा ठरलं की मुंगीलाही कळत नाही-चंद्रकांत पाटील….
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय स्तरावर भाजपकडून काही फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर एनडीए सरकारमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपकडून नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याजागी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. विनोद तावडे यांना काय द्यायचे, हे केंद्र ठरवेल. भाजप पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे की, आमचं ज्या स्तरावर ठरतं ती गोष्ट शेजारच्या मुंगीलासु्द्धा कळत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विनोद तावडे हे कर्तृत्त्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यांना जिथ पाठवू त्याठिकाण यश कसे मिळेल, यादृष्टीने सगळे बारकावे ते पाहतात. 1995 ला चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात सरचिटणीस झाले. नंतर चार वर्षात ते भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष झाले. यानंतर ते भाजपचे अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून दिल्लीत गेले, आता ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले आहेत. आज भाजप पक्ष चालवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे विनोद तावडे यांना काय द्यायचं आणि काय नाही, हे केंद्र सरकार ठरवेल. भाजपमध्ये खूप माणसं आहेत, एखाद्या व्यक्तीचा संबंधित पदावरील कार्यकाळ संपल्यावर त्याला बदलले जाते. त्यामुळे विनोद तावडे यांच्याबाबत अनेक पर्याय चर्चेत आहेत. पण काहीही झालं तर ते मोठेच होतील आणि मला याचा खूप आनंद आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

अमित शाहांनी फडणवीसांना थांबायला सांगितलंय, ते पुन्हा कामाला लागलेत: चंद्रकांत पाटील
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपच्या खासदारांची संख्या थेट नऊपर्यंत खाली घसरली होती. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे पहिल्या क्रमांकाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. या सगळ्याविषयी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. भाजप पक्षसंघटनेत नेत्याच्या इच्छेपेक्षा पक्षादेश महत्त्वाचा असतो. नेत्याने फक्त इच्छा व्यक्त करायची असते, आज्ञा करायची नाही. त्यामुळेच आम्ही टिकून आहोत. अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांनी थांबण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घेऊन पुन्हा कामाला सुरुवात केली आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 65 हजार झाडं लावणार
चंद्रकांत पाटील यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्ताने 65 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. कोल्हापुरातील शेंडा पार्क या ठिकाणी चंद्रकांतदादा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राज्यातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, सोलापूर या जिल्ह्यात दादांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्ष लागवड केली जातेय. केवळ वृक्ष लागवड न करता त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील घेतली गेलीय. दरवर्षी चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमधून साजरा केला जातो. यावर्षी चंद्रकांतदादा यांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने 65 हजार वृक्ष लावले जाणार आहेत.

Post Views: 38
Previous Post

तुळजापुरात वीज पडलेल्या जागेतून येत आहे चक्क निळ्या रंगाचं पाणी

Next Post

मणिपूर आगीत जळतंय, त्राही त्राही करत आहे, त्याकडे कोण लक्ष घालणार? मोहन भागवतांचा सवाल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मणिपूर आगीत जळतंय, त्राही त्राही करत आहे, त्याकडे कोण लक्ष घालणार? मोहन भागवतांचा सवाल

मणिपूर आगीत जळतंय, त्राही त्राही करत आहे, त्याकडे कोण लक्ष घालणार? मोहन भागवतांचा सवाल

ताज्या बातम्या

सांगोला येथे १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त;अन्न व औषध प्रशासनाची कारवाई #viral #solapurnews

July 11, 2026
चौफेर विकास कामामुळे अक्कलकोट तीर्थ क्षेत्र विकासला चालना – उद्योग मंत्री उदय सामंत

चौफेर विकास कामामुळे अक्कलकोट तीर्थ क्षेत्र विकासला चालना – उद्योग मंत्री उदय सामंत

July 11, 2026

सीतामाय तलावातून पाणीपुरवठा सुरू करा

July 11, 2026
ग्रामीण भागात चोऱ्यांच्या सत्राला चाप! पोलिसांकडून ‘ग्राम सुरक्षा दला’ला काठी व शिट्टीचे वाटप

ग्रामीण भागात चोऱ्यांच्या सत्राला चाप! पोलिसांकडून ‘ग्राम सुरक्षा दला’ला काठी व शिट्टीचे वाटप

July 11, 2026
घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; दोन सराईत चोरटे जेरबंद – ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; दोन सराईत चोरटे जेरबंद – ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 11, 2026

श्री न.फु.शहा कोठारी प्रशालेत पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न

July 11, 2026
करकंब येथे सुवासिनी पूजन आणि श्री.चौंडेश्वरी भावई उत्सव

करकंब येथे सुवासिनी पूजन आणि श्री.चौंडेश्वरी भावई उत्सव

July 11, 2026
वेळापूर पालखी तळावर जिल्हा प्रशासनाकडून मॉक ड्रिल

वेळापूर पालखी तळावर जिल्हा प्रशासनाकडून मॉक ड्रिल

July 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0971184

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!