पिलीव – माळशिरस तालुक्यासह पिलीव परीसरात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात प्रचंड बदल जाणवत असुन ढगाळ वातावरण तसेच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.यामुळे खरेतर बहरात असणाऱ्या द्राक्ष बागायतदार, आंबा उत्पादक शेतकरी तसेच गहु ,हरभरा ,व इतर अनेक पिके शेतकऱ्यांच्या शेतात बहरात आहेत.
महिनाभरात गहु ,हरभरा ,कांदा ,मका काढणीला वेग येणार आहे .सध्या ही पिके पुर्ण बहरात आहेत.यंदा गहु व हरभरा पिकांसाठी हवामान अतिशय पोषक असल्यामुळे पिक अतिशय जोमदार आले आहेत यंदा गहु व हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा आहे .
पण या अवकाळी पावसाची शेतकऱ्यांना प्रचंड धास्ती लागली आहे .सध्या गहु ,हरभरा, कांदा ,मका पिके तर ,द्राक्ष, आंबे ,शेवगा ,चिंच केळी या फळबागा पुर्ण पणे बहरात आहेत .पण अवकाळी पावसाच्या सावटामुळे शेतकरी अक्षरश देव पाण्यात घालुन बसले असुन अवकाळी पावसाचे सावट ताबडतोब जावे असे देवाकडे साकडे घालुन बसले असुन सध्या सर्वच शेतकऱ्यांचे या हवामान बदलांकडे लक्ष लागले असुन हाता तोंडाशी आलेला घास निसर्ग हातातुन नेतोय की काय अशी शेतकऱ्यांमध्ये सध्या भिती सुटली आहे.
शेतकऱ्यांच्या मागची संकटे काही केल्या कमी होईनात गतवर्षी अतिवृष्टीने नुकसान झाले होते .तर आता पुन्हा अवकाळी च्या सावटाची शेतकरयांनमधये धास्ती आहे.पिलीव परीसरावरील अवकाळीचे संकट दूर व्हावे यासाठी शेतकरी अक्षरश देव पाण्यात घालुन बसले आहेत . फोटो _ कुसमोड येथील शेतकरी संजय पाटील यांच्या शेतातील गव्हाचे पिक






















