बार्शी – सध्या मानव निर्मित आपत्तीचे प्रमाण वाढले असून आपत्ती काळात आपण कणखर मनोधैर्याने आपत्ती व्यवस्थापनाचे कार्ये केले पाहिजे. त्याच बरोबर आपत्तीला सामोरे जाताना सजगतेने आपली सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, असे प्रतिपादन पुअहो सोलापूर विद्यापीठातील रासेयो संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात संचालक डॉ. राजेंद्र वडजे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रकाश पाटील होते.
पुढे डॉ. वडजे म्हणाले की, आपत्तीचे साधारणपणे दोन प्रकार असून नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती असे प्रकार आहेत. रासेयोमधील स्वयंसेवक समृध्द व चाणाक्ष करण्यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. आपत्ती येण्याआगोदर पूर्वतयारी, आपत्ती काळातील सजगता आणि आपत्ती नंतर पूनर्वसन करण्यासाठी योग्य असे व्यवस्थापन करताना आपल्यात माणूसकी असली पाहिजे. तसेच आज जगता हवेचे प्रदुषणाने प्रमाण झपाट्याने वाढ होत असून पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.
अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व उत्तम बनवता येतो. प्रत्येकाने आपला स्वताचा स्वार्थ न पाहता व्यापक समाज हित जपले पाहिजे. समाज सुधारणा करण्यासाठी विधायक दृष्टिकोन विचारात घेतला पाहिजे. युवकांनी आपण मानसिक व शारीरिक दृष्ट्या सजग होऊन समाज सुदृढ बनविला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पुढे आले पाहिजे असे ही त्यांनी सांगीतले.
यावेळी प्राचार्य डॉ. अब्दुल शेख, विज्ञान शाखा समन्वयक डॉ. रामेश्वर कोठावळे, कला शाखा समन्वयक डॉ. बिरा पारसे, डॉ. गुणवंत सरवदे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. दामाजी भिसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज चिकराम, कार्यक्रम अधिकारी प्रा. समाधान लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम सत्रात प्रभारी प्राचार्य डॉ. संजय करंडे यांनी आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकासाची संकल्पना याविषयावर उदाहरणासह मार्गदर्शन केले. तर व्दितीय सत्रात प्रसिध्द डॉ. धीरज जाधव यांनी प्रथमोपचार सीपीआर याविषयावर प्रात्यक्षिकांच्या सहाय्याने अनमोल असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्तावना प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. आसावरी फरताडे यांनी तर आभार प्रा. समाधान लोंढे यांनी मानले.
बार्शी येथे आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी संचालक डॉ. राजेंद्र वडजे. यावेळी संस्थेचे सचिव प्रकाश पाटील, प्राचार्य डॉ. शेख, डॉ. कोठावळे, डॉ. पारसे, आदी उपस्थित होते.






















