अक्कलकोट – संत गाडगे बाबा महाराजांच्या कार्यातून आदर्श घेऊन नागरिकांनी रस्ते, मंदिरे आणि विहिरी स्वच्छ बाबत स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. समाजाने त्यांच्या सर्वंकष कार्यापासून आदर्श घेऊन शहर स्वच्छता व विकासामध्ये योगदान द्यावे असे प्रतिपादन अक्कलकोट नगरपालिका शिक्षण मंडळ, प्रशासनाधिकारी सोमशंकर स्वामी यांनी केले.
मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, पर्यवेक्षक सूर्यकांत रूगे, समुपदेशक सिद्धू विटकर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,जातीभेद निषेधार्थ आहे असे सांगून महाराजांनी मानवतेचा संदेश दिला लोकांना श्रमाचे महत्त्व पटवून दिले “काम करा, प्रगती करा” हा संदेश दिला. स्वच्छ भारत संकल्पना त्यांच्या विचारातूनच साकारण्यात आली. त्यांनी निस्वार्थ सेवा करा अशी शिकवण दिली. म्हणून त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले आभार कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका डॉ शितल झिंगाडे भस्मे यांनी मानले कार्यक्रमास शितल फुटाणे, हर्षदा गायकवाड, सौरभ भस्मे, ऐश्वर्या तारापुरे, भीम सोनकांबळे आदी उपस्थित होते.
गाडगे महाराज विज्ञानवादी संत
समाजातील रूढी परंपरा अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले त्यामुळे ते खऱ्या अर्थाने विज्ञानवादी संत होते असे प्रतिपादन अभिवादन कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करताना सोमशंकर स्वामी व मान्यवर
























