वेळापूर – माळशिरस येथील सुमित्रानगर याठिकाणी अनाधिकृत सुरू असणारा मस्जिदची इमारत तातडीने जमीनदोस्त करून संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी वेळापूर येथील ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासनाला सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर निवेदन देण्यात आले आहे.
प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनानुसार, सन २०२१ मध्ये सुमित्रा नगर वेळापूर या ठिकाणी मस्जिदचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायतला हिंदू नागरिकांनी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर ग्रामपंचायतने संबंधितांना नोटीस काढली होती या नोटिसीला उत्तर देताना संबंधितांनी या ठिकाणी आम्ही कोणतेही धार्मिक स्थळ बांधत नसून राहण्यासाठी घर बांधत असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाला लिहून आश्वासन दिले होते. सदर वाद हा न्यायालयात ही गेला होता.
मागील काही दिवसांपासून या परिसरामध्ये दररोज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असल्याचे पुरावे हिंदू नागरिकांना मिळाल्यानंतर नागरिकांनी वेळापूर पोलीस ठाणे व ग्रामपंचायत कार्यालयात हा अनाधिकृत असणारा ढाचा तातडीने पाडावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा आशयाचे निवेदन दिले आहे.
परदेशातील नागरिकांचे येणे जाणे असल्याची स्थानिकांना शंका !
सदर ठिकाणी आठ ते नऊ फूट उंच कंपाउंड घेण्यात आल्या असून या ठिकाणी परदेशातील नागरिकांचे येणे जाणे असल्याबाबत स्थानिकांना शंका आहे. या परिसरात आढळणारे व्यक्ती यापूर्वी कधीही तालुक्यात व जिल्ह्यात स्थानिकांनी पाहिले नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.



















