Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. प्रीतम भी. गेडाम यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

तरुण भारतbyतरुण भारत
April 1, 2026
in editor
0
डॉ. प्रीतम भी. गेडाम यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय तर्फे व्यसनमुक्ती साठी पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळापासून भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्ति विशेष व संस्थाना “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” द्वारे पुरस्कृत करुन त्यांचा अमूल्य कार्याचा गौरव करण्यात येतो. नुकताच हा पुरस्कार सोहळा मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात मोठ्या थाटात पार पड़ला. नागपूर शहरातील उच्चशिक्षित आणि प्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रमधारक डॉ. प्रीतम भी. गेडाम यांना लेखक गटात त्यांच्या व्यसनमुक्तीच्या अमूल्य समाजकार्याचा सन्मान करण्यासाठी शासनाचा हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला, ही नागपूर शहरासाठी सोबतच संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे. उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, धनादेश, शॉल प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

डॉ. प्रीतम भीमराव गेडाम विद्यार्थी जीवनापासूनच व्यसनमुक्तीच्या कामाला लागले, वर्ष २००८ ला समाजकार्य विषयात स्नातकोत्तर पदवीचे शिक्षण घेताना ते शिक्षक डॉ. विनोद गजघाटे सरांच्या मार्गदर्शनात काम करण्यासाठी त्यांचा व्यसनमुक्ती केंद्राशी जुळले, डॉ. गेडाम यांनी लोकांना व्यसनावर मात करण्यास मदत करण्यासाठी हळूहळू पथनाट्ये, शिबिरे, समुपदेशन आणि मार्गदर्शन करायला सुरूवात केली. सोबत व्यसनाच्या समस्येवर लेखन करायला देखील सुरुवात केली, जनजागृतिसाठी त्यांचा जीवनातील वर्तमानपत्रात प्रकाशित पहिला लेख “नशेच्या गंभीर समस्येच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर दुष्प्रभाव” हा होता, तिथून त्यांच्या लेखनाची सुरुवात होऊन आज सामाजिक समस्येवर भारतात सर्वात जास्त द्विभाषिक प्रकाशित लेखांचा विक्रम त्यांचा नावावर नोंदवल्या गेला आहे. व्यसनमुक्तीसाठी प्रकाशित त्यांच्या लेखांवर वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. डॉ. गेडाम नेहमी सांगतात की, व्यसन एक असे विष आहे जे प्राशन करणाऱ्या व्यक्तीला तर वेदनेने महागड्या आजाराने अकाली मारते, पण त्याचे कुटुंब, नातेवाईक, शेजार आणि समाजावर सर्वांवर गंभीर परिणाम होतो. कुटुंबाची शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती देखील खालावते, गैरवर्तन आणि गुन्हेगारी वाढते, तसेच व्यसन करणाऱ्यांचा लोक द्वेष ही करतात.

ह्या शासकीय सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री), एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री), सुनेत्रा अजित पवार (उपमुख्यमंत्री), रामदास आठवले (केंद्रीय राज्यमंत्री), राहुल नार्वेकर (अध्यक्ष, विधानसभा), संजय शिरसाट (मंत्री, सामाजिक न्याय), माधुरी मिसाळ (राज्यमंत्री, सामाजिक न्याय), अरविन्द सावंत (लोकसभा सदस्य) डॉ. हर्षवर्धन कांबळे (प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग), दीपा मुधोळ – मुंडे (आयुक्त, समाज कल्याण, पुणे) होते. सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाट यांनी डॉ. गेडाम यांचा समाजकार्याचे कौतुक केले, कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून समाज कल्याण विभागाचे आयुक्तांपासून, अधिकारी, कर्मचारी वर्ग, स्वयंसेवक सज्ज होते. खंजरी वादक कीर्तनकार सत्यपाल महाराज सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.

सामाजिक कार्य आणि लेखन व्यतिरिक्त, डॉ. प्रीतम गेडाम जनजागृतीसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवितात. ते देशातील अनेक नामांकित संस्था आणि संघटनेशी जुडून आहेत. ते सध्या नागपूर मधील रायसोनी एज्युकेशन ग्रुपच्या सदर कॅम्पसमध्ये विभागप्रमुख म्हणून काम करतात. त्यांना यापूर्वी भारत आणि परदेशातून अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नागपूर शहरातील व्यक्तिविशेषला या प्रतिष्ठित शासकीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचा शहरवासियांना अभीमान आहे, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post Views: 61
Previous Post

एलपीजी गॅसचा तुटवडा; पुरवठा सुरळीत न झाल्यास  चक्का जाम आंदोलनाचा इशारा

Next Post

मायबोली सांस्कृतिक मंडळात ‘आमचं गण्या’ अर्थात “हसवणूक” चा ग्रीष्मात हास्यवर्षाव 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मायबोली सांस्कृतिक मंडळात ‘आमचं गण्या’ अर्थात “हसवणूक” चा ग्रीष्मात हास्यवर्षाव 

मायबोली सांस्कृतिक मंडळात 'आमचं गण्या' अर्थात “हसवणूक” चा ग्रीष्मात हास्यवर्षाव 

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207626

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!