सदाशिवनगर – माळशिरस तालुक्यातून आळंदी ते पंढरपूर हा पालखी महामार्ग गेला असून नातेपुते माळशिरस या ठिकाणी बायपास रोड करण्यात आले आहेत दोन्ही गावाला बायपास रस्त्यावरून शहरात जाण्यासाठी सर्विस रोड करण्यात आले आहेत वास्तविक पाहता या दोन्ही ठिकाणी अंडरपास अथवा ओव्हर ब्रिज होणे गरजेचे होते परंतु ते न झाल्याने या तिन्ही ठिकाणी सातत्याने अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत .
सततच्या अपघाता नंतर नातेपुते ,यादव पेट्रोल पंप ,६ १ फाटा व वाडी कुरोली या चार ठिकाणी उड्डाणपूल मंजूर केल्याचे समजते त्यापैकी नातेपुते व वाडी कुरोली या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूलांची कामे सुरू झाली आहेत परंतु माळशिरस मधील यादव पेट्रोल पंप व ६ १ फाटा या दोन्ही ठिकाणची कामे मंजूर असताना अद्यापही सुरू झालेली नाहीत या दोन्ही ठिकाणी सातत्याने अपघात घडत आहेत याची गंभीर दखल घेऊन ही दोन्ही उड्डाण पुलाची कामे तातडीने सुरू करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

























