सदाशिवनगर – माळशिरस पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या चाळीस दुचाकी गाड्या मूळ मालकांना परत देण्यात आल्याची माहिती माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे यांनी दिली.
माळशिरस पोलीस ठाण्यात गेले अनेक वर्षापासून विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या,हरवलेल्या दुचाकी गाड्या ठेवण्यात आल्या होत्या .सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार ,अकलूज चे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनानुसार सदर गाड्या त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
या सूचनेअंतर्गत माळशिरस पोलीस ठाण्याच्या वतीने या दुचाकी मूळ मालकांना त्याच्या दुचाकी कागदपत्राची पडताळणी करून ,त्या गाड्या मूळ मालकांना परत करण्यात आल्या.ज्या गाड्यांचे नंबर बदलण्यात आले होते त्याचा इंजिन व चेसी नंबर वरून आर टी ओ अधिकाऱ्यांशी संपर्क करून मालकांची नावे शोधली.तपासणी नंतर पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे , एमसहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोसावी, सहाय्यक फौजदार राजेंद्र सरवदे ,यांच्या उपस्थितीत या गाड्या मूळ मालकांना परत देण्यात आल्या.



























