अक्कलकोट – येथील माणुसकी फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील उडगी हायस्कूल येथे मराठी, कन्नड व सेमी इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात माणूसकी फौंडेशनच्या वतीने येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचे सुपूत्र तथा युवा नेते प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते १२०० वह्या व ४० स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना युवा नेते प्रथमेश इंगळे म्हणाले की माणुसकी फाउंडेशनने राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देणे हीच खरी समाजसेवा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मन लावून ज्ञानार्जन करावे आणि आपले उज्ज्वल भविष्य घडवावे हाच माझा संदेश आहे, कारण माणुसकी फाउंडेशनच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांतून कौतुक होत आहे असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंदे सर यांनी केले तर आभार नागेंद्र नारायणकर सर यांनी मानले. या वेळी
या कार्यक्रमास माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत क्षीरसागर, आशिष हुंबे, बाबूशा भालके, आकाश शिंदे, रीलस्टार रवी कुंभार, रमेश शिंदे सर, अमोल महाडिक, समर्थ स्वामी, प्रसाद माने, फाउंडेशनचे सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय जानराव सर, पर्यवेक्षक नागेंद्र नारायणकर सर, ज्येष्ठ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – उडगी हायस्कूल येथे मराठी, कन्नड व सेमी इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना प्रथमेश इंगळे दिसत आहेत.
Post Views: 15