पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून, अध्यक्षपदी नाना मदने तर उपाध्यक्षपदी अश्विनी वगरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तर सर्वसाधारण सदस्य योगेश देशमुख,रघुनाथ नरळे,संतोष बोडरे,सारंग बनसोडे,सचिन मदने,महिला सदस्यरेश्मा रवींद्र खामगळ,रुक्सार जुबेरखान पठाण,राजश्री ओंकार जोशी,आम्रपाली सुरज वाघमारे यांच्या निवडी करण्यात आल्या.
निवड प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक राजू गोरवे आणि सर्व शिक्षकवृंदाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन उत्साहात सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक राजू गोरवे यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ते म्हणाले,”शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे आणि भौतिक सुविधांचा दर्जा सुधारणे ही काळाची गरज आहे. नवनिर्वाचित व्यवस्थापन समिती आपल्या सक्रिय योगदानातून शाळेला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा मला ठाम विश्वास आहे.”
या निवडीबद्दल पिलीव परिसरातील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी आणि पालकांकडून नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 8