Saturday, August 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरचे अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक पर्यटन- आव्हानापासून समृद्धीकडे..!

तरुण भारतbyतरुण भारत
July 17, 2026
in solapur
0
सोलापूरचे अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक पर्यटन- आव्हानापासून समृद्धीकडे..!
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

      सोलापूर जिल्हा हा सर्वांसाठी अध्यात्मिक पर्यटनाचे केंद्रबिंदू म्हणून प्रसिद्ध आहे. अशा समृद्ध सोलापूर जिल्ह्यातील आणि आजूबाजूतील मंदिरे यामुळे सोलापूर जिल्ह्याला आणि शहराला एक वेगळे नाव रूप आले आहे. अशातच काही बाबींवर आपण लक्ष दिले तर सोलापूर सारखा जिल्हा महाराष्ट्र राज्य नव्हे, देशातच नव्हे, तर जगभरामध्ये पोहोचू शकतो.
खरं पाहिलं तर आध्यात्मिक पर्यटनाला साजेसे असे वातावरण या जिल्हामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात आहे. याचा पूर्ण फायदा स्थानिकांना तसेच देवदर्शनाला आलेल्या भाविकांना झाला पाहिजे हेच प्रयत्न असतात. तसं पाहिलं तर महाराष्ट्रातूनच नव्हे, देशातून तसेच जगातून देवदर्शन आणि ऐतिहासिक आणि भौगोलिक पर्यटनाला सोलापूर मध्ये येत असतात. सोलापूर जिल्हा हा फक्त मंदिरांसाठी प्रसिद्ध नसून इतर ऐतिहासिक व भौगोलिक गोष्टींसाठी ही प्रसिद्ध आहे आणि त्यांचा वारसा या शहराला आणि जिल्ह्याला लाभला आहे. तसं पाहिलं तर अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर तसेच सिद्धेश्वर यांचे मंदिर भाविकांना नक्कीच आकर्षित करत असतात. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा हा रेल्वे, रस्ते, विमानसेवा आणि खाजगी आणि सरकारी बसेस अशा विविध पद्धतीने जगाशी जोडला गेला आहे. याचा नक्कीच फायदा स्थानिक स्तरावर होत आहे. सोलापूर शहरात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण राहण्याच्या सोयी म्हणजे हॉटेल-रेस्टॉरंट, लॉजिंग तसेच भक्ती निवास हे निर्माण होऊन भक्तगणांना आणि पर्यटनांना सोयी देत असतात. त्याचप्रमाणे सोलापूरचे खाद्य संस्कृती ही अतिशय उत्तम आहे. इथली शिंगा चटणी पासून कडक भाकरी आणि मांसाहारी पदार्थ इतके सुंदर रित्या बनवले जातात की जिभेला चव विसरता येत नाही. काही जण खास खाद्य संस्कृतीसाठी सोलापुरात येतात. याचा फायदा हॉटेल आणि रेस्टॉरंटला होत आहे. चविष्ट पदार्थाचा आनंद घेताना राहण्याची ही उत्तम सोयी निर्माण झाल्या आहेत. अगदी पंचतारांकित हॉटेल पासून साधे राहणीमान असलेले लॉजेस आपल्याला सहज पाहायला मिळतात. या सर्वांना पर्यटकांच्या सोयीसाठी वापरले जात आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती होत आहे. काही कौशल्यपूर्ण कामगार वर्ग सर्व पर्यटकांना सोयी देत असतो, त्याचा नक्कीच फायदा कामगारांचे कुटुंब चालवण्यासाठी होत आहे, हा एक सकारात्मक भाग आहे. आध्यात्मिक पर्यटना बरोबरच मेडिकल टुरिझम मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. आपल्या शहरातील आणि जिल्ह्यातील कौशल्यपूर्ण डॉक्टर यामुळे आजूबाजूचे लोक आणि रुग्ण शहराकडे आकर्षित होत आहेत. याचाही मेडिकल टुरिझम म्हणून फायदा शहराला आणि जिल्ह्याला होत आहे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या शहरांमध्ये काही ऐतिहासिक अभ्यासात येऊन भेट देतात. अशातच ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू तसेच भौगोलिक वैशिष्ट्यामुळे जिल्ह्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी फक्त पर्यटन म्हणून नाही तर अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा काही जण भेट देतात. अशातच जर शासनाने सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरण निर्माण केले तर नक्कीच अजून जास्त लोक इकडे आकर्षित होतील, यात काही शंका नाही. आज सोशल मीडियाचा वापर करून सोलापूरचे नाव सात समुद्र पार नेले पाहिजे. यासाठी युवा पिढीने पुढे येऊन अभ्यासू दृष्टीने सोलापूरचे सकारात्मक गोष्टी जगासमोर ठेवल्या पाहिजे. त्यामुळे सोशल मीडियाची ताकद लक्षात घेऊन अनेक दृष्टीने फायदा करून देणाऱ्या पर्यटन क्षेत्र याला भरभराट आणायचे काम युवा पिढीने केले पाहिजे. त्याचबरोबर अनुभवी लोकांनी योग्य मार्गदर्शन करत पर्यटनासाठी पोषक वातावरण निर्माण केले गेले पाहिजे. अशामुळे नक्कीच आर्थिक दृष्ट्या या शहराला बळकटी येईल आणि जिल्ह्याचेही नाव रूप होईल. एकंदरीतच सोलापूरचा विकास सर्वांनी मिळून केला पाहिजे आणि पर्यटन क्षेत्र हे कमी खर्चामध्ये जास्त फायदा देणार क्षेत्र ठरत आहे. त्यासाठी सर्वांनीच आपापल्या परीने योग्य असे मार्ग काढून प्रयत्न करत राहिले पाहिजे एवढेच इथे नमूद करू इच्छितो.
Post Views: 74
Previous Post

पिलीव केंद्र शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नाना मदने, तर उपाध्यक्षपदी अश्विनी वगरे यांची बिनविरोध निवड!

Next Post

नालेसफाई कंत्राटात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नालेसफाई कंत्राटात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

ताज्या बातम्या

श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या विकासाला निधी देऊ आ देवेंद्र कोठे यांनी दिला शब्द#solapurnews

August 14, 2026

दैनिक तरुण भारत वर वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचा झाला वर्षाव#news #solapur

August 14, 2026

श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या विकासाला निधी देऊ आ देवेंद्र कोठे यांनी दिला शब्द #news#viral

August 14, 2026

सोलापुरात ‘हर घर तिरंगा’अभियान उत्साहाने संपन्नसर्वधर्म एकता मंचाकडून मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप #news

August 14, 2026

ऐतिहासिक क्षण लोकसभेत पहिल्यांदा संपूर्ण वंदे मातरम सादर #news #viral

August 14, 2026

राष्ट्रवादीचे उमेश पाटील व सुहास कदम यांच्यावर पाच कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा #news #viral

August 14, 2026

सोलापूरातून पद्मशाली बांधवांकडून पद्मावती देवीला जाणार माहेरची साडी #news #solapurnews #marathinews

August 14, 2026

कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद #news #solapurnews

August 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1063179

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!