सोलापूर : शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी सोलापुरात आगमन झाल्यानंतर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने पालखीतील सुमारे ७०० वारकऱ्यांना दैनंदिन वापरातील जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
प्रभाकर महाराज मंदिर, सम्राट चौक, बाळीवेस, चाटी गल्ली मार्गे पूर्व मंगळ पेठेतील भुसार गल्ली, जैन मंदिर परिसरात पालखी दाखल झाल्यानंतर श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर वारकऱ्यांना साबण, तेल, टूथपेस्ट, टूथब्रश, पावडर, झेंडू बाम, अंगसाबण, सुमो स्प्रे, नॅपकिन, टॉवेल आदी जीवनावश्यक साहित्य असलेल्या किटचे वितरण करण्यात आले.या उपक्रमात आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, संचालक वेदांत तालिकोटी व राम क्षीरसागर यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज छंचुरे, अथर्व शिंदे, यश तालिकोटी, अथर्व कोळुरे, वेदांत तमशेट्टी, श्रेयस कोळुरे, संदेश शेरीकर, बसवराज बेऊर, राज बेऊर, आकाश वाघमारे, प्रथमेश व्हड्राव, अप्पा साखरे आणि प्रमोद छंचुरे यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 19