मंगळवेढा – दिल्लीतील जंतरमंतरवरील नीट पेपरफुटीवर आंदोलकांवर अमानुष्य लाठीचार्ज करून, व अन्नुधुराच्या नळकांड्या फोडून महिलावर उद्यानुष्य अत्याचार केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवेढा बंदचे आयोजन करण्यात आले. हाेते.दरम्यान शहरातील बाजार पेठा दिवसभर बंद आसल्याने सर्वत्र शूकशूकाट पसरला हाेता.
यावेळी मागण्याचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे यांना देण्यात आले.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. बाळासाहेब आबेडकर यांच्या आदेशान्वये आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. दामाजी चौकात श्री संत दामाजी पंताच्या पुतळ्याला वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोक माने व शशिकांत रोकडे याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून केंद्र सरकार व पोलिस खात्याच्या निषेधार्थ घोषणा देत शहरातून मोर्चा काढत केंद्रिय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घेतला पाहिजे.दोषी पोलिसांवर कारवाई केली पाहिजे.आंदोलकाशी सुसंवाद साधून समाधानकारक मार्ग काढावेत.आंदोलनातील जखमींना योग्य ती शासकिय मदत मिळावी. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सदर घटनेची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे.या मागण्याचे निवेदन देण्यात आले. दरम्यान आज मंगळवेढा बंदचे आवाहन केले. बंद बाबत व्यापाऱ्यांना व्यवस्थित कल्पना नव्हती.त्यामुळे शहरात आलेल्या नागरिकांना ऐनवेळी गैरसोयीचा सामना करावा लागला. मात्र व्यापा-याच्या व्हाट्सअप ग्रुपवर व्यापाऱ्यांनी बंद बद्दल व्यापारी असोसिएशनने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करून देखील याबाबत प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यानी शहरात फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करा असे आवाहन केले व व्यापाऱ्याने त्याला प्रतिसाद दिला दुपारनंतर जनजीवन पूर्ववत झाले. दरम्यान पोलिसांना दिलेल्या निवेदनावर वंचित तालुकाध्यक्ष अशोक माने,शहर अध्यक्ष अजय गाडे,जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, जिल्हा महासचिव सोमनाथ ढावरे,काँग्रेस शहर अध्यक्ष अँड.राहुल घुले, सिद्धार्थ लोकरे, सतीश लोकरे, ईसाक शेख, अखिल होलार समाज अध्यक्ष मधुकर भंडगे, माजी उप नगराध्यक्ष विजय खवतोडे,अँड. बापू मेटकरी,पोपट पडवळे किशोर कसबे,बाळासाहेब वाघमारे विठ्ठल सरवदे,संजय सरवदे,नागेश ऐवळे,चन्नाप्पा भोरकडे,सुभाष आसबे, वसंत सरवदे, प्रसाद सरवदे,विनोद सरवदे,दत्ता सरवदे,हौलू सरवदे, विश्वास सरवदे हरी वाघमारे,प्रदीप परकाळे,अनिल सोनवले,सतिश लोकरे,तुषार शेंबडे गणेश धोत्रे,दादा मुजावर, शांतीलाल भोरकडे,उमेश केंगार विलास भोरकडे,वसंत माने,डि.के. साखरे,अंकुश शेवडे,विक्रम शेंबडे विकास जावळे यांच्या सह्या आहेत
Post Views: 14