सोलापूर – सोलापूरच्या पूर्व भागातील अनेक महिलाना एकत्र करून ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती सक्षमता विभागाच्या वतीने विधी मिळणाऱ्या महिलांना मातृभाषा तेलुगु असतानाही मराठीतून अभंग व कीर्तन भजन म्हणण्याचे प्रशिक्षण देऊन अध्यात्माच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे या महिला विठ्ठलाच्या चरणी आपली भक्ती वाहण्यासाठी मातृभाषा म्हणजेच तेलुगु भाषेतूनही पांडुरंगाला अभंग सादर करत आहेत. त्या त्यांच्या या सादरीकरण पाठीमागे पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपुरात जाऊ शकलो नाही तरी शब्दसुमनाने हृदय सेवा करीत आहोत असा संदेश दिला आहे.
रोज आपल्या विडी वळण्याचे काम करून विड्या झाल्यानंतर या महिला दीड ते दोन तास या भजनाच्या सरावाला देतात. भजन कोणते आहे अभंग कोणते आहे त्यातील शब्द काय आहेत टाळ वाजवण्याची कला किंवा पेटी आणि तबल्यासोबत भजनाचे शब्द कसे म्हणायचे आहेत या सगळ्याची अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सराव प्रशिक्षण घेऊन या महिला तयार झाल्या आहेत. सध्या दीडशेहून अधिक महिला याचं काम करत असून शहरातल्या विविध भागांमध्ये यांचे गट तयार करण्यात आले आहेत यासाठी विशेष ताई काम करत असून समन्वयासाठी याच गटातील महिला पुढाकार घेतात आणि त्यांना हवी त्या पद्धतीने प्रशिक्षणाची तयारी ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री सक्षमता विभागाच्या अंबिका मॅकल या करतात.
कर्तव्यासह अध्यात्माचा आनंद मिळतो
विडी कामगार महिलांना २४ तासही कमी पडतात. घरचे काम करून पुन्हा विड्या मिळण्याचे काम या महिलांना करावे लागते विड्या झाल्यानंतर त्या कारखान्यात नेऊन देणे आणि पुन्हा येणे असे दिवसभर व्यस्त असतात. त्यातूनही आपल्यात ईश्वराचा अध्यात्म अंश रुजवावा या प्रांजळ भावनेतून या महिला रोज वेळ देतात आणि एकमेकांना बोलावून घेऊन सराव करतात. त्यातून शब्दा शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात म्हणजेच कर्तव्य आणि आनंद याचा मेळ घालून या महिला पांडुरंगाच्या चरणी शब्दसुमन वाहत आहेत. याकरिता ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे सहकार्यवाह डॉक्टर अमोल गांगजी यांनी प्रेरणा दिली आहे.
अंबिका म्याकल – स्त्री सक्षमता विभाग प्रमुख
वेगळंच समाधान मिळते
आम्ही रोज आमचे काम करतोच मात्र काम करून पुन्हा दुपारी भजन कीर्तन करतो. त्याचा आनंद गगनात मावणारा नाही. या आनंदाने आम्हाला वेगळेच अपूर्व समाधान मिळते ज्ञानप्रबोधिनीने आम्हाला ज्या पद्धतीने प्रशिक्षण दिले आहे त्याचे किती आभार मानावे तितके कमी आहेत या उपक्रमासाठी आम्ही कायम सकारात्मक असतो आणि सक्रियही असतो.
मधुरा देवनपल्ली – भक्त महिला
गुलाबी साडीतील महिलेचा फोटो हा अंबिका मॅकल यांचा आहे प्रमुख प्रशिक्षिका
Post Views: 17