याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते अजितदादा पवार व स्व.दलित मित्र कदम गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अॅड.सुजित कदम,उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,अकॅडमीक अॅडमिनिस्ट्रेटर डॉ.मीनाक्षी कदम,सचिवा् डॉ.प्रियदर्शनी महाडिक,जुनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या तथा संचालिका प्रा.तेजस्विनी कदम, संचालक यतीराज वाकळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील ग्रंथप्रमुख डॉ.सचिन तोरडमल अजितदादा पवार यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि,अजितदादा पवार यांचा जन्म 22 जूलै 1959 रोजी देवळाली प्रवरा, राहुरी,अहिल्यानगर येथे झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते पुतणे होते. त्यांनी 1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत आपल्या संसदीय कारकिर्दीची सुरुवात केली.नंतर त्यांनी प्रदीर्घकाळ बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार हे शिस्त, वक्तशीरपणा आणि आक्रमक विकास कामांसाठी ओळखले जात असत. 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीला जात असताना त्यांचे विमान बारामती विमानतळाजवळ क्रॅश झाले. या अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. प्रा.डॉ.बसवराज स्वामी यांनी सुत्रसंचालन केले व आभार प्रा.गायकवाड सर यांनी मानले. यावेळी सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





















