बार्शी – शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब बार्शी रॉयलकडून आदर्श शिक्षक म्हणून चाटे शिक्षण समूहाचे संचालक पांडुरंग घाडगे यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन क्लबकडून सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लायन्स क्लब रिझन वनमधून झोन वनच्या झोन चेअरमन ला. ॲड. अमिता कारंडे मॅडम उपस्थित होते त्यांनी पण क्लबला भेट देऊन क्लबच्या सेवा कार्याचा व अध्यक्षांचा शब्दसुमनाने गौरव केला
तसेच क्लबमधील शिक्षक ला. दयानंद रेवडकर, ला. ज्योती रेवडकर, ला. सुनिता खाडे या शिक्षणचा पण सन्मान सन्मान चिन्ह देऊन अध्यक्षांकडून गौरवण्यात आले
तसेच या महिन्यातील अभियंता दिनामुळे क्लबमधील तेरा अभियंत्यांचा सन्मान ला. अमिता कारंडे मॅडम यांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. यामध्ये ला. जितेंद्र दोशी माजी प्रांतपाल, ला. राहुल दोशी, ला. गणेश भंडारे, ला. सुमित जैन, ला. राजेश खाडे, ला. अमर काळे, ला. महावीर शहा, ला. रीना शहा, ला. अमोल गुंडेवार, ला. उमेश जाधव, ला. मनिष रुगले हे सर्व क्लबमधील अभियंता असून क्लबसाठी उत्कृष्ट सेवा कार्य करत असतात
तसेच ४१ देशाची नाणी संग्रहाबद्दल उदय पोतदार त्यांच्या पण क्लब सोबत मुलांसाठी दोन कार्यशाळा आयोजन केल्यामुळे पोतदार यांचा पण क्लबकडून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. डॉ. किरण लाड व ला. अमृता गुंडेवार यांनी केले प्रमुख पाहुण्यांची ओळख ला. ज्योती रुगले व ला. मनिष रुगले यांनी करुन दिली. कार्यक्रमासाठी क्लबमधील सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.