सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC आणि NBKBYF Fans, सोलापूर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने विष्णू नगर येथील पोशम्मा मंदिरासाठी १००० लिटर क्षमतेची सिंटेक्स पाण्याची टाकी यशस्वीरित्या प्रदान करण्यात आली.
आज आयोजित करण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.
पाण्याच्या टाकीचे उद्घाटन स्थानिक पोशम्मा मंदिराच्या पुजारी निर्मला ताई दंडी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्थानिक मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष सिद्राम मादगुंडी , व्यंकटेश मादगुंडी, रवि साई, शिवराज केंचुगुंडी तसेच
रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC चे अध्यक्ष रो. नरसिंह कनकी, सचिव रो. श्रीनिवास नंदाल, रो. पीपी. विठ्ठल वंगासर, रो. एजी. चार्वाक बुर्गुल उपस्थित होते.
तसेच NBKBYF Fans चे सचिव श्रीनिवास कट्टा, खजिनदार नागनाथ बंडा, गोपाल मिठ्ठा, देविदास मंगलपल्ली, रघुनाथ केंचुगुंडी, श्रीनिवास बिंगी आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे मंदिर परिसरातील पाणीपुरवठ्याची सुविधा अधिक सुलभ होणार असून, उपस्थित मान्यवरांनी रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC आणि NBKBYF Fans यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.




















