पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनिअर कॉलेजमधये अँड वैभव मेथवडे यांनी बाल लैंगिक अत्याचार याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच बाल लैंगिक अत्याचार यावर कायद्याची तरतूद तसेच आवश्यक असणारे कलम याविषयी शिक्षक दिनी सविस्तर मार्गदर्शन केले .या शिक्षकदिनानिमीत आयोजीत कार्यक्रमात मुख्याध्यापक म्हणून कु शरयु देशमुख, उपमुख्याध्यापक म्हणून लक्ष्मण करांडे,पर्यवेक्षक म्हणून कु गौरी गोडसे यांनी काम पाहिले.सदरच्या या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो _ कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन करताना ॲड वैभव मेथवडे.




















