सोलापूर – शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष व्याख्यानमाला आज श्री शिवाजी अध्यापक विद्यालय, नेहरू नगर, सोलापूर येथील बहुउद्देशीय सभागृहात उत्साहात संपन्न झाली.
या व्याख्यानमालेस प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. कार्तिक चव्हाण, शोभाश्री मल्टिस्टेट बँकेचे श्री. किरण पुजारी, समलती फोटो स्टुडिओचे फोटो आर्टिस्ट श्री. श्रीनिवास सामलेटी, जागतिक कीर्तीचे चित्रकार श्री. नितीन खिल्लारे आणि कला शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. शेरशाह डोंगरी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन राज्य सहसचिव श्री. शांतप्पा विठ्ठल काळे व सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. शशिकांत सदाफुले यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष धारेराव यांनी केले.
*तज्ञांचे विषयवार मार्गदर्शन*
– *एलिमेंटरी ग्रेडसाठी -* वस्तूचित्र – श्री. संभण्णा हलोळी, स्मरणचित्र – श्री. नितीन खिल्लारे, संकल्पचित्र – सौ. स्वाती साठे, भूमिती व अक्षरलेखन – श्री. ज्ञानेश्वर कांबळे.
– *इंटरमिजिएट ग्रेडसाठी -* वस्तूचित्र – श्री. शेरशाह डोंगरी, स्मरणचित्र – श्री. शशिकांत सदाफुले, संकल्पचित्र – श्री. नागराज रमणशेट्टी.
यावेळी विद्यार्थ्यांना वस्तूचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र, भूमिती व अक्षरलेखन या विषयांवर सखोल व प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी विजय बिज्जरगी, ज्ञानेश्वर कांबळे, सूर्यकांत शिवशरण, मल्लिनाथ जमखंडी, आकाश नंदुर, सिद्धाराम काळे, षण्मुखानंद दाते, संभण्णा हालोळी, नागराज रमणशेट्टी, सचिन कोरे, काशिनाथ वाघमारे, स्वाती साठे, विद्या पाटणे, आधी कला शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Post Views: 21