बार्शी – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बार्शी शाखेतर्फे प्रतिवर्षी महाराष्ट्रातील साहित्यिकांना साहित्य पुरस्कार वितरित केले जातात. हे पुरस्कार शाहीर अमर शेख यांचे नावाने दिले जातात. यासाठी राज्यभरातून साहित्य कृती मागविल्या जातात. गद्य प्रकारातील दोन आणि पद्य प्रकारातील दोन असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. पुरस्कार वितरणाचे हे अठरावे वर्ष असून रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप असते. साहित्यिकारांनी (लेखक/ लेखिका, कवी/कवयित्री) पुढील नियमांचे पालन करुन आपले प्रकाशित साहित्य दोन प्रतीत पाठवावे, असे आवाहन बार्शी मसापचे अध्यक्ष पां.न. निपाणीकर यांनी साहित्यिकांना केले आहे.
नियम व अटी- दि. १ जानेवारी २०२५ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेले गद्य, पद्य पुस्तके फक्त पुरस्कारांसाठी ग्राह्य धरली जातील. साहित्यकांनी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती पाठवाव्यात. सोबत आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, व्हाट्सअप नंबर, फोटो, मिळालेले पुरस्कार इत्यादी माहिती स्वतंत्र कागदावर पाठवावी. आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती दि. ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने श्री गिरीश सोनार, साई प्रिंटिंग प्रेस,
नवी चाटे गल्ली, बार्शी ४१३४०१ जि. सोलापूर. या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी 7499834393 या क्रमांकावर संपर्क करावा.
पुरस्कार वितरण समारंभ नोव्हेंबर २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यात पार पडेल. पुरस्कार विजेत्यांना दिनांक, ठिकाण कळविले जाईल. जास्तीत जास्त साहित्यिकांनी साहित्य पाठविण्याचे आवाहन कार्याध्यक्ष प्रा. डॉ.रविराज फुरडे, कोषाध्यक्ष बी.आर. देशमुख, कार्यवाह प्रकाश गव्हाणे, सहकार्यवाह श्री प्रकाश महामुनी,श्री दिलीप कल्याणी, गिरीश सोनार यांनी केले आहे.
Post Views: 9