सोलापूर : वाहन चालविण्याच्या वादातून डोक्यावर आणि शरीरावर ब्लेडने सपासप वार करून एका तरुणाला गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना जुना कुंभारी नाका परिसरात
२१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राघवेंद्र हणमंतु खुने (रा. वेणुगोपाल नगर, सोलापूर) आणि त्याचा एक अज्ञात साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत
अजय अंबादास मोने (रा. भारतरत्न इंदिरा नगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
बुधवारी सायंकाळी जुना कुंभारी नाका येथील बी प्रकाश बार येथे वाहन चालविण्याच्या कारणावरून फिर्यादी अजय मोने आणि आरोपी राघवेंद्र खुने यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात आरोपीने अजयच्या डोक्यावर तसेच सर्वांगावर ब्लेडने वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलीस हवालदार वाघमोडे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 15