बार्शी – सामाईक विहिरीतील पाणी उपसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावाने लोखंडी खो-याने मारहाण करून भावाला जखमी केल्याची घटना बार्शी तालुक्यातील धोत्रे येथे २० ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी विठ्ठल प्रल्हाद जाधवर याच्याविरूद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडलिक प्रल्हाद जाधवर (वय ५५, रा. धोत्रे) हे आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटार सुरू करण्यास गेले होते. मात्र, त्यांचा भाऊ विठ्ठल यांने आधीच मोटार सुरू केली होती. यावेळी कुंडलिक यांनी पिकांना पाणी देण्यासाठी मोटार बंद करण्यास सांगितले असता, विठ्ठल याने ‘तू विहिरीवर यायचे नाही’ असे म्हणत शिवीगाळ केली.
त्यानंतर घरासमोर पडलेल्या लोखंडी खो-याने कुंडलिक यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर तसेच डाव्या खांद्यावर मारहाण करून त्यांना जखमी केले. यावेळी फिर्यादीची पत्नी इंदूबाई व सून सरस्वती यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र. आरोपीने त्यांनाही विहिरीवरील मोटार सुरू करू नका, अशी धमकी देत शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मध्यस्थी करून वाद मिटववण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांनाही विहिरीवरील मोटार सुरू करू नका, अशी धमकी देत शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
जखमी कुंडलिक जाधवर यांच्यावर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी २० ऑक्टोबर रोजी रात्री १०,५० वाजता बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १९८(१), ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Post Views: 15