सोलापूर – सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडजी गावामध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दोन्ही गटांना समुपदेशन करून वाद सामंजस्याने मिटविला. यावेळी संबंधित दोन्ही गटांतील व्यक्तींना आपापसातील वाद, मतभेद आणि संघर्ष यामध्ये वेळ वाया न घालवता सकारात्मक विचारसरणी स्वीकारून समाजासाठी आणि स्वतःच्या भविष्यासाठी विधायक कार्य करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पोलिसांच्या या समुपदेशनाला सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही गटांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही गटांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यास मदत होणार आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात कडून अवलंबिलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post Views: 14