विद्यार्थिनींच्या डोळ्यांचे आरोग्य जपणे, दृष्टीदोषांचे वेळीच निदान करणे आणि आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. योग्य वेळी नेत्रतपासणी व चष्म्यांचा वापर केल्यामुळे विद्यार्थिनींना अभ्यासात अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येणार आहे.
या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. शाळेतील विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. हा उपक्रम केंद्रीय विशेष शिक्षक रूपाली कैंची मॅडम यांच्या प्रयत्नातून व प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर डॉ.प्रियांका कांबळे व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने आणि उपमुख्याध्यापक श्री.तुकाराम श्रीराम सर व पर्यवेक्षक श्री.परमेश्वर बाबळसुरे सर उपस्थितीत यशस्वीरीत्या संपन्न झाले..या वेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.उमा कोटा यांनी सर्वांचे आभार मानले.
विद्यार्थिनींचे आरोग्य, उत्तम दृष्टी आणि उज्ज्वल भविष्य यांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.























