पंढरपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर येथे २२ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन ज्युडो स्पर्धेमध्ये उमा महाविद्यालयाने घवघवीत यश संपादित केले.
मुलांमध्ये सार्थक रामचंद्र वाघमोडे (७३ किलो वजनी गट) सिल्वर मेडल, पृथ्वीराज अनिल नरळे (८१ किलो वजनी गट), ब्रांझ मेडल, शिवशंकर सुभाष आसबे (-१०० किलो वजनी गट) ब्रांझ मेडल, तर मुलींमध्ये साक्षी सुभाष सागर हिने( -४५ किलो) वजनी गटात ब्राँझ मेडल मिळविले. या सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष मुकुंद परिचारक, सचिव राजगोपालजी भट्टड, खजिनदार रमेश लाड, संथेचे विश्वस्त अॅड. प्रणव परिचारक, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद परिचारक, इतर संस्था पदाधिकारी, व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धिरजकुमार बाड यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेसाठी शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद ढवण, कार्यालयीन अधीक्षक सज्जन लोंढे तसेच गोरख खताळ, पैगंबर शेख, व तुकाराम लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
Post Views: 13