मंद्रूप: भीमा नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या वाळू चोरांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. औज (मं.) येथे गुरुवारी पहाटे ५:०० वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी २ ट्रॅक्टर आणि १ जेसीबी मशीन घटनास्थळा वरून जप्त केली आहे. भीमा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळूची चोरी होत असल्याची खात्रीशीर माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे दोन्ही पथकांनी पहाटेच नदीपात्रात छापा टाकला.
या प्रकरणी वाळू चोरी करणारे आणि वाहनाचे मालक अय्याज जाफरसो पाटील यांच्यासह इतर २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राम महसूल अधिकारी किरण कोढुळे यांनी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे, निंबरगी मंडळ अधिकारी राणा वाघमारे आणि तलाठी निंगु कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















