बार्शी – तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार आदेशाचे उल्लंघन करुन फिरणाऱ्या एका इसमावर बार्शी तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
दि. ७ जुलै रोजी सपोनि सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे जामगाव येथील बाळराजे चौक परिसरात एक तडीपार इसम फिरत आहे. त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन संशयित इसमास ताब्यात घेतले.
चौकशीअंती त्याचे नाव तथागत मुकेश मस्के (वय २४ वर्षे, रा. भीमनगर, बार्शी) असे असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित इसमास बार्शी तालुक्यात फिरण्याबाबत विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. तपासात त्याच्याविरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर यांनी दिलेल्या सोलापूर व धाराशिव जिल्हा तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी संबंधित इसमाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 142 अन्वये बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करीत आहेत.
Post Views: 5